त्र्यंबकेश्वर
तालुका जिल्हा नाशिक, महाराष्ट्रराज्य
त्र्यंबकेश्वर तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे.
लोकसंख्या
त्र्यंबकेश्वर तालुका
भारताची जनगणना २०११ नुसार, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याची एकूण लोकसंख्या १,५६,३६७ आहे.
७९,१२८
पुरुषांची संख्या:
७७,२३९
स्त्रियांची संख्या:
८९५.८५ चौ.किमी
क्षेत्रफळ
१,५६,३६७
एकुण

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन






त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्व
त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात. त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथे च केली जाते. या व्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय जाप, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थ विधी हे व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.
त्र्यंबकेश्वर
तालुक्यातील विभागनिहाय योजना
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते योजनेअंतर्गत
• नवीन सिंचन विहीर पॅकेज
• जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
• शेततळे अस्तरीकरण
पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो
२) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील)
सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते यामध्ये
• नवीन सिंचन विहीर पॅकेज
• जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
• शेततळे अस्तरीकरण
पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो
३) पशुसंवर्धन विभागयोजना
• राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादना सचालना देण्यासाठी २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी/ २ म्हशींचे गट वाटप करणे
• लाभार्थी प्राधान्य : महिला बचत गटातील लाभार्थी,अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार
• लाभ: २ दुधाळ देशी / २ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे,सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्केआणिअनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,
• गट किंमत: रु.७०,०००/- प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/-२ म्हशींचा गट रु.१७९२५८/-
४ ) राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढीपालनाव्दारे शेतक-यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे
• योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
• लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
२५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
• लाभ – १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढायांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.
२५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
• गट किंमत:उस्मानाबादी/ संगमनेरी शेळी रु.१०३५४५/-,स्थानिक शेळी रु.७८२३१/-,मडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-, दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-
५) १००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपाना द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
• योजना कालावधी : २०१३ ते आजपर्यंत.
• लाभार्थी प्राधान्य:अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षितबेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी
• लाभ – एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोररूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युती करण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५टक्के अनुदान
६ ) जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासि क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत २ दुभत्यागाई /म्हशी गट वाटप करणे
• योजना कालावधी : २०११ते आजपर्यंत, २७.०४.२०२३पासून सुधारती स्वरुपात
• लाभार्थी प्राधान्य: दारिद्र्य रेषे खालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी.
• लाभ-२ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५टक्के अनुदान,
• गट किंमत: रु.७०,०००/-प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/- २म्हशींचा गट रु. १७९२५८/-
योजनेच्या अटी व शर्ती
- योजनेच्या अटी व शर्ती शेतकऱ्याकडे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सक्षम प्राधिकार्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक
- शेतकऱ्याकडे किमान क्षेत्र 0.40 ते जास्तीत जास्त 6.0 हे. असावे
- अधिक संपर्कासाठी कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्याशी संपर्क करावा
- जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% किंवा मर्यादित अनुदानावरती कृषी अवजारे बी बियाणे डीबीटी द्वारे खरेदी अनुदान योजना
- राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस सयंत्रास अनुदान देणे
- नैसर्गिक आपत्ती जळीत झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान योजना
त्र्यंबकेश्वर
तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे

त्र्यंबकेश्वर मंदिर
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.

अंजनेरी
अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. हे हनुमंतरायांचे जन्मस्थान आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. तसेच या पर्वतावर इंद्राणी इंद्राने इंद्राने तपश्चर्या केल्यामुळे याला इंद्र पर्वत सुद्धा म्हणतात. अंजनेरी पर्वतावर जाताना एक हनुमान कुंड आहे ते हनुमंतरायांच्या पायाने निर्माण झालेले आहे. त्याच्या उजव्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर एक गुहा लागते त्याच गुहेमध्ये हनुमंत रायाला अंजनी मातेने जन्म दिलेला आहे. वायु देवाने गुहेत प्रवेश करून अंजनी मातेला दीक्षा दिली तिथे एक मोठे छिद्र पडलेले आहे, तिथे हनुमंत रायाची अंजनी माते सोबत एक मूर्ती आहे. अंजनेरी पर्वतावर विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. तसेच हनुमंतरायाच्या पायाने तयार झालेले तळे आजही प्राण्यांची तहान भागवते.

हरिहर किल्ला
नाशिक जिल्ह्यातल्या सेलबारी, डोलबारी, अजंठा, सातमाळ आणि त्र्यंबक या डोंगरांवर बरेच जुने किल्ले आहेत. यातलाच एक प्रमुख किल्ला म्हणजे त्र्यंबक रांगेतला हरिहर किल्ला. खूप पूर्वी, महाराष्ट्राच्या बंदरांवरून येणारा माल नाशिकच्या बाजारपेठेत नेण्यासाठी वेगवेगळे घाट वापरले जायचे. यापैकी एक घाट म्हणजे त्र्यंबक रांगेतला गोंडा घाट. या घाटाचा काळजीपूर्वक पाहिरावा करण्यासाठीच हरिहर आणि भास्करगड हे किल्ले बांधले गेले होते. नाशिकच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेकडे त्र्यंबक रांग आहे. ही रांग दोन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात बसगड, उतवड, फणीचा डोंगर, हरिहर आणि त्रिंबकगड हे सर्व किल्ले येतात. तर दुसऱ्या भागात अंजनेरी आणि घरगड हे सर्व किल्ले येतात.

ब्रह्मगिरी - ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (फेरी)
त्र्यंबकेश्वर इथे महादेवाचे दर्शन घेतात, कुशावर्तात अंघोळ करतात, काही पूजा अर्चा ज्या फक्त इथेच होतात त्या करतात, त्यातले काही जण पाठीमागे असलेल्या ब्रह्मगिरी वर शंकराच्या जटा पाहून परत येतात. पण मुळात या ब्रह्मगिरी पर्वतावर खूप काही आहे, या पर्वताला पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आजच्या भटकंती मध्ये संपूर्ण ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार पाहणार आहोत तसेच मेटघरचा किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूने हत्तीदरवाजा गडाचे अवशेष पाहत खाली उतरू. आणि गडाला वळसा घालून पुन्हा त्र्यंबकेश्वर. थोडक्यात काय तर संपूर्ण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा .

नेकलेस धबधबा (Necklace Waterfall)
नेकलेस धबधबा हा निसर्गरम्य, शांत आणि फोटोजेनिक धबधबा आहे. तो अनेक ठिकाणी आढळणाऱ्या “नेकलेससारख्या” आकारामुळे लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्रात अशा आकाराचे काही धबधबे आढळतात, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा पाण्याचा प्रवाह नेकलेससारख्या वळणाने खाली येतो.

ब्रह्मगिरी
त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते, हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेचा उजवीकडील भाग हा मूळ डोंगररांगे पासून थोडा वेगळा झालेला भासतो, एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरी शी जोडला गेला आहे. थोड्या अंतरावर दारुकोठार ही दिसते. पण एक प्रश्न डोक्यात येऊन राहतो कि दारू कोठार वाड्याच्या इतके जवळ कसे काय? या वाड्याच्या अवशेषांचा रेफ्रेन्स शोधण्याच्या प्रयन्त केला पण काही सापडले नाही. इथून पुढे पायवाटेने आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकराच्या जटाचे मंदिर दिसत असते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुढग्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी अक्खय्यिका आहे.
कायदा
केद्रिय माहितीचा अधिकार कायदा 2005 मधील कलम 4 अंतर्गत प्रसिदधकरावयाच्या 17 मुद्याबाबतची माहिती जिल्हा परिषद, नाशिक. - पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (सन 2024-25)
| नियंत्रणाची यंत्रणा | ||
|---|---|---|
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक | जिल्हा परिषद नाशिक | |
अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | ||
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) | ||
| गटविकास अधिकारी सहा.गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी उपविभागीय अभियंता (इवद,लपा,ग्रापापु) | पंचायत समिती त्रंबकेश्वर | |
ग्रामपंचायत अधिकारी | ग्रामपंचायत | |
भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती
1) भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ
त्र्यंबकेश्वर तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण असून ते अतिशय भव्य आणि सुंदर आहे. काळ्या पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात करण्यात आला होता. मंदिरातील लिंग हे इतर शिवलिंगांसारखे नसून पाण्याच्या धारेत तीन वेगवेगळ्या मुद्राधारी आकृती दिसून येतात. दर सोमवार देवाची पालखी असते व या पालखीत शिवाची धातूची मूर्ती स्थानापन्न असते. त्र्यंबकेश्वर तालुका हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. त्र्यंबकेश्वर तालुकयाचे क्षेत्रफळ : 895.85 चौ.किमी आहे
2) हवामान
त्र्यंबकेश्वर येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मिमी पर्यंत असते.
3) राजकीय माहिती
त्र्यंबकेश्वर तालुका हा नाशिक जिल्ह्यातील तालुका आहे. त्र्यंबकेश्वर (अ.जा. राखीव) विधानसभा मतदार संघ आहे. हा तालुका नाशिक लोकसभा मतदार संघात येतो. गावपातळीवर ग्रामपंचायती, तर शहरात नगरपरिषद कार्यरत आहे. तालुक्याच्या कारभारावर देखरेख करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी (BDO) व जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे आहे.
4) भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ
त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.
5) पार्श्वभूमी
त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.
प्रशासकीय संरचना




पंचायत समिती त्र्यंबकेश्वर
अधिकारी
| अ.नं. | पदनाम | अधिकारी/कर्मचारी यांचे नांव | दुरध्वनी क्रमांक / फॅक्स / ईमेल | पत्ता |
|---|---|---|---|---|
| १ | गटविकास अधिकारी (उ.श्रे.) | श्री. रविकांत रामचंद्र सानप | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| २ | सहाय्यक गट विकास अधिकारी | श्री. हेमंत गोकुळ बच्छाव | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ३ | बालविकास प्रकल्प अधिकारी-१ (त्र्यंबकेश्वर) | श्रीम. मंगला शांताराम भोये | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ४ | बालविकास प्रकल्प अधिकारी-२ (हरसुल) | श्रीम. मंगला शांताराम भोये | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ५ | गटशिक्षण अधिकारी | श्री. मोठाभाऊ रामचंद्र चव्हाण | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ६ | उपअभियंता लपा | श्री. दीपक विजय महाजन | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ७ | उपअभियंता ग्रापापू | श्री. रोहित गोविंद राठोड | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ८ | उपअभियंता इवद | श्री. सतिश साहेबराव दराडे | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ९ | पशुधन विकास अधिकारी (विस्तार) | डॉ. योगेश् संपतराव मेहरे | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| १० | तालुका वैद्यकीय अधिकारी | डॉ. मोतीलाल बाजीराव पाटील | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| ११ | कृषि अधिकारी | श्री. महेश बाबुराव नागपुरकर | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| १२ | विस्तार अधिकारी ग्रामपंचायत | श्री. ज्ञानेश्वर गोकुळ सपकाळे | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
| १३ | विस्तार अधिकारी ग्रामपंचायत | श्री. संदीप शंकर खैरनार | nsktrambak@gmail.com | प.स. त्र्यंबकेश्वर |
श्री. रविकांत रामचंद्र सानप
गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती त्र्यंबकेश्वर
श्री. हेमंत गोकुळ बच्छाव
सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर
कशासाठी प्रसिद्ध:
धम्मगिरी विपश्यना केंद्र:
जगातील एक मोठे ध्यानकेंद्र.
ट्रेकिंग व साहस पर्यटन:
कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड यांसारखे लोकप्रिय ट्रेक.
निसर्गसौंदर्य:
पावसाळ्यातील धबधबे, हिरवीगार दऱ्या, विलोभनीय नजारे.
चित्रपट चित्रीकरण:
सुंदर निसर्गामुळे बॉलिवूड चित्रपटांसाठी आवडते ठिकाण.
प्रेक्षणीय स्थळे – इगतपुरी
1.धम्मगिरी विपश्यना केंद्र:
जगातील एक मोठे ध्यानकेंद्र, जगभरातून साधक येथे येतात.
2. कळसुबाई शिखर
:महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर (१,६४६ मी.) – प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाण.
3.भवली धरण व धबधबे:
पावसाळ्यात विशेष आकर्षक असलेले धरण व धबधबे.
4.त्रिंगलवाडी किल्ला:
ऐतिहासिक डोंगरकिल्ला, सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य.
5.घाटांदेवी मंदिर:
घाटांचे रक्षण करणाऱ्या देवीचे प्रसिद्ध मंदिर.
6.वैतरणा धरण / अपर वैतरणा तलाव:
रमणीय परिसर, तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे जलाशय.
7. कॅमल व्हॅली:
पावसाळ्यात धबधबे व धुक्यामुळे सुंदर दिसणारी दरी.
8. अमृतेश्वर मंदिर (रतनवाडी, जवळच):
हेमाडपंती शैलीतील प्राचीन शिवमंदिर (११व्या शतकातील).
📩 आमच्याशी संपर्क साधा
तुमच्या प्रश्नांसाठी, सूचना किंवा माहितीकरिता खालील फॉर्म भरून आमच्याशी संपर्क साधा. आम्ही लवकरच प्रत्युत्तर देऊ.
(FAQ)
त्र्यंबकेश्वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
उत्तर: त्रंबकेश्वर तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ८९५.८५ चौ.किमीआहे.
उत्तर: २०११ च्या जनगणनेनुसार त्रंबकेश्वर तालुक्याची एकूण लोकसंख्या १,५६,३६७ आहे.
उत्तर: एकूण वर्षभर हवामानाचा सारांश
सर्वात थंड महिने: डिसेंबर – जानेवारी
सर्वात उष्ण महिने: एप्रिल – मे (पण जास्त गरमी पडत नाही)
सर्वात पावसाळी महिने: जुलै – ऑगस्ट
पर्यटनासाठी उत्तम काळ: ऑक्टोबर – फेब्रुवारी
उत्तर: त्र्यंबकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (त्र्यंबक) तालुक्यात, ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे.
हे नाशिक शहरापासून सुमारे 28–30 किलोमीटर अंतरावर आहे.
काही छायाचित्र









संपर्क
पंचायत समिती त्रंबकेश्वर-
पत्ता -
त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक -
9881264490 (ग.वि.अ संपर्क क्रमांक)
9423697629 (सहा.ग.वि.अ संपर्क क्रमांक)
ई -मेल -
nsktrambak@gmail.com
जिल्हा परिषद, नाशिक
जिल्हा परिषद, नाशिक / प्रकल्प संचालक
(सामान्य प्रशासन)
(ग्रामपंचायत)
(पाणी व स्वच्छता)
(सामाजिक व आरोग्य)
(प्राथमिक/माध्यमिक)
(सार्व.१,२,३,४)
(बांधकाम/पाणी/प्रकल्प)
